Farmer ID : फार्मर आयडीद्वारे मिळणार विविध योजनांचा लाभ; जिल्ह्यात ३ लाख १५ हजार शेतकऱ्यांची ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत नोंदणी
Digital Farming : अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ३.१५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यांना फार्मर आयडीच्या माध्यमातून योजनांचा लाभ मिळणार आहे. मात्र ५३,४४१ शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने प्रक्रिया रखडली आहे.
मलकापूर : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पध्दतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.