अर्धवट निघालेल्या पिकावर शेतकऱ्याने फिरविला नांगर, बोरगाव मंजूत शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 27 June 2020

येथील भाग तीन मध्ये येत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेत पूर्ण केली, बी. बियाणे, खत विकत घेऊन मृग नक्षत्रात १५ जून दरम्यान पेरणीही केली, मात्र त्यानंतर पाऊसाने पूर्णतः दांडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढविले असल्याने शेतकरी यंदाही आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र बोरगाव मंजूत परिसरात बघायला मिळत आहे.

बोरगाव मंजू (जि.अकोला) ः येथील भाग तीन मध्ये येत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेत पूर्ण केली, बी. बियाणे, खत विकत घेऊन मृग नक्षत्रात १५ जून दरम्यान पेरणीही केली, मात्र त्यानंतर पाऊसाने पूर्णतः दांडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढविले असल्याने शेतकरी यंदाही आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र बोरगाव मंजूत परिसरात बघायला मिळत आहे.

बोरगाव मंजू परिसरात शेत सर्व्हे नंबर ३४३ सह अनेक शेतकऱ्यांची भाग तीन या क्षेत्रात काळी जमीन आहे .दरवर्षी प्रमाणे त्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पिकाची १५ जून रोजी पेरणी केली.त्यानंतर त्याच रात्री पेरणी केलेल्या भागात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे पेरणी केलेलं बियाणं जमिनी मध्ये दडपले. त्यानंतर १२ दिवस होऊन सुद्धा पाऊस पडला नसल्याने पेरणी केलेल्या शेतात फक्त १० टक्के सोयाबीन पीक उगवले तर उरलेले ९० टक्के पीक पाऊस न पडल्याने उगवले नाही त्यामुळे ह्या भागातील शेतकरी वैभव तायडे, विनोद खेडकर, जगदीश जीराफे, हरिभाऊ वैराळे, कलीमोद्दीन कयामोद्दीन यांनी जवळपास दोनशे एकर शेतातील अर्धवट निघालेले पीक नांगरून दुबार पेरणी साठी शेत तयार करण्यासाठी कामे सुरू केली. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून यंदा सुद्धा शेतकऱ्यांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने ह्याची दखल घेऊन आम्हाला आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. तर ह्या बाबत बोरगाव मंजू येथील शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भरत बोरे हे सदर शेतकऱ्याच्या दुबार पेरणीचा प्रश्न पंचायत समिती स्तरावर मांडून त्यांना शासकीय मदत कशी देता येईल ह्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer turns plow on partially harvested crop, Borgaon Manjut farmers face double sowing crisis