शासनाच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त : रणधीर सावरकर | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रणधीर सावरकर
शासनाच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ः सावरकर

अकोला : शासनाच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त : रणधीर सावरकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘‘अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केली. पीकविमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या नाकर्त्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले’’, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केला.

सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार, हेक्टरी ५० हजार मदत द्या, अशा मागण्या करणाऱ्या उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी केल्या. मात्र, गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीचा, महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना किरकोळ मदत करीत चेष्टा केली.’’

हेही वाचा: "शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले" खासदार संजय राऊत

‘‘पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १५०० कोटींची तातडीची मदत करण्यात आली. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. जनावरे वाहून गेली. घरे पडली. मात्र सरकारी मदतीत शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचारही केला गेला नाही. मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीही आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आली नाही,’’ असेही ते म्हणाले.

धरणे तुडूंब; कालवे नादुरुस्त
अकोला जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरली आहेत. तरीही कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने अद्यापपर्यंत निधी दिलेला नाही. त्यामुळे पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. वारंवार मागणी करूनही निधी मिळत नसल्याने सर्वजण त्रस्त आहेत, असे सावरकर म्हणाले.

loading image
go to top