
शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा! - जिल्हाधिकारी पापळकर
अकोला ः मृग बहार २०२१ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना राज्यातील २६ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकऱ्यांसह कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. (Farmers should take advantage of fruit crop insurance scheme! - Collector Papalkar)
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी, मुंबईची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळण्याकरीता संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू या फळ पिकाकरिता बुधवार 30 जून तर डाळिंब फळपिकाकरीता 14 जुलै 2021 या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे.
अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांच्यासोबत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे
Farmers should take advantage of fruit crop insurance scheme! - Collector Papalkar