esakal | जिगाव प्रकल्पाच्या भिंतीवर शेतकऱ्यांची आमरण उपोषणाला सुरुवात | Farmer Fasting
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agitation

जिगाव प्रकल्पाच्या भिंतीवर शेतकऱ्यांची आमरण उपोषणाला सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जामोद) (जि. बुलडाणा) - जिगाव सिंचन प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण तालुक्यातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी कलम ११/२१ लागू करून त्यांना शासनाने केव्हाच पूरेपूर मोबदला दिला आहे. परिसरातील कोसो दूरच्या शेतकऱ्यांच्या सर्व जमिनीचा भूसंपादनचा मार्ग पैसे देऊन मोकळा झाला. परंतु, प्रकल्पापासून केवळ शंभर मीटर अंतरावरील ग्राम तिवडी आणि सुलतानपूरच्या डुबीत जमिनीचा भूसंपादनाचा मार्ग जिगाव प्रकल्प विभागाने हेतुपुरस्पर प्रलनबीत ठेवला आहे. या मोबदल्याची शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या भिंतीवर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

जास्त पाऊस, अतिवृष्टी झाल्यास तिवडी आणि सुलतानपूर ही धरणाच्या लगतची १००% पाण्याखाली जाणार आहेत. शासनाने याबाबतीत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. शासन या शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळत आहे. शेतकऱ्यांच्या या भूसंपादनाच्या प्रश्नाविषयी वारंवार आंदोलने केली. या विभागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसह रात्रभर मुक्काम आंदोलन सुद्धा केले आहे.

हेही वाचा: Akola : मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना २० वर्षांची शिक्षा

याविषयी प्रशासनाने वारंवार दिलेले शब्द फिरवले आहेत. कलम ११ लागू केल्यानंतर ही शब्द फिरवणे म्हणजे हा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे. येत्या आठवड्यात जिगाव प्रकल्प अंतर्गत तीवडी आणि सुलतानपूरच्या जमीन हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला नाही. याविषयी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह जि.प.चे विरोधी पक्षनेते बंडू पाटील यांनी १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी ११ ऑक्टोबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला होता. ११ ऑक्टोबर पर्यंत सदरचा प्रश्न हा मार्गी न लागल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाचे भिंतीवर ११ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनात दिनकर पाचपोर, भगवान गाईत,सुनिल घाईट, पंडितराव घाईट, वासुदेव घाईट, उल्हास गई,तेजराव घाईट, लहू झाल्टे,भास्कर झाल्टे संतोष गवई विजय झाल्टे संतोष झाल्टे गोवर्धन झाल्टे, भाऊराव झल्टे, प्रशांत झाल्टे या शेतकरी मंडळींनी ११ ऑक्टोबर पासून जिगाव धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणा दरम्यान कार्यकारी अभियंता राळेकर यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली.

loading image
go to top