

अकोला (मूर्तिजापूर) : तालुक्यातील माना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुरूम ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील मधापुरी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची घटना ता. १७ फेब्रुवारी रोजी घडली. आकाश दिगंबर पवार (वय ३३ रा, अकोलखेड, ता.अकोट), विक्की ज्ञानेश्वर गवळी (वय ३५, रा.मधापुरी) असे मृतकांचे नावे आहे.