esakal | दोन हजार रुपयांसाठी सासऱ्याने सुनेला घातल्या गोळ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Father-in-law's firing for two thousand rupees

शनिवारी रात्री पुन्हा त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचल्यावर सासरा मोहन क्षीरसागर याने घरात ठेवलेल्या देशी कट्ट्याने सुनेवर गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळी घुसल्याने सून सोनाली ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले.

दोन हजार रुपयांसाठी सासऱ्याने सुनेला घातल्या गोळ्या 

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर (जि. अकोला) : उसने घेतलेले पैसे परत न केल्याने झालेल्या वादातून गोळीबार व मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याा घटनेत चक्क सासऱ्याने सुनेवर देशी कट्ट्याने गोळ्या झाडल्या. यामध्ये सून गंभीर जखमी असून तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सासऱ्यावर बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

ही घटना बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरवाकडी येथे घडली. सोनाली अक्षय क्षीरसागर असे जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, कोरोना टाळेबंदीच्या काळात सासरा मोहन हरिभाऊ क्षीरसागर याच्या जवळून सुनेने दोन हजार रुपये उसने घेतले होते. मात्र ते परत दिले नाही. त्यामुळे दररोज सासरा व सुनेमध्ये वाद होत होते. 

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून
 

शनिवारी रात्री पुन्हा त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचल्यावर सासरा मोहन क्षीरसागर याने घरात ठेवलेल्या देशी कट्ट्याने सुनेवर गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळी घुसल्याने सून सोनाली ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सासऱ्याला अटक केली. 

राजस्थानहून आणला देशी कट्टा? 

या घटनेत वापरलेला देशी कट्टा राजस्थानमधून आणल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आरोपी मोहन क्षीरसागर याची बहीण राजस्थानला आहे. आरोपीचे राजस्थानला येणे - जाणे होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी त्याने राजस्थान मधून देशी कट्टा आणला असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन  : अतुल मांगे