esakal | पोट-निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

बोलून बातमी शोधा

पोट-निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

पोट-निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमध्ये व्हावयाच्या रिक्त पदाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता. २०) प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेचे १४ गट व त्याअंतर्गत २८ गणांत पोट-निवडणूक घ्यायची आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. संबंधित तहसिलदारांनी अंतिम मतदार याद्या २० एप्रिल रोजी प्रसिद्ध करुन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध केल्या आहेत.

जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग, त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांच्य्या मतदार याद्या माहितीसाठी संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प., पं.स. ग्रा.पं. निवडणूक विभाग अकोला संजय खडसे यांनी कळविले आहे.

संपादन - विवेक मेतकर