
अकोला : जनता भाजी बाजार (Janta Bhaji Bajar) येथील वार्षिक भाडेपट्यावरील जागे संदर्भात नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने म्हणने ऐकून घेण्यारिता महानगरपालिका प्रशासनाकडून (Akola Muncipal Corporation) ता.१० ते १२ मे दरम्यान सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतू अकोला शहरामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भावावर (corona Virus) नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाउन लावला आले आहे. त्यामुळे जनता भाजी बाजार येथील व्यावसायिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यास अडथळा निर्माण होत असल्याने ही सुनावणी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. Finally, the hearing of Akola traders was adjourned
कोरोना संकटात दररोज ७००-८०० व्यक्ती संक्रमित होत आहेत. शहरातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मनपाने कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित असताना मनपा आयुक्तांनी मनपतील सत्ताधाऱ्यांच्या स्वप्नातील जनता भाजी बाजाराच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्यासाठी तेथील व्यापाऱ्यांना नोटीसा पाठवून हुसकावून लावण्याचा प्रकार चालविला असल्याचा आरोप पठाण यांनी केला होता.
शासनाने अकोला जिल्ह्यातील वाढलेली रुग्ण संख्या पाहता कडक लॉकडाउन लावलेले असताना मनपा आयुक्त यांनी जनता भाजी बाजार येथील ५०० व्यापाऱ्यांना नोटीस बजाविल्या असून, त्यांचा सुनावणी घेण्यासाठीचा खटाटोप सुरू आहे.
कोरोनाच्या काळात मनपा प्रशासन काही दिवसांपासून जनता भाजी बाजारातील व्यापारांना व व्यावसायिकांना नोटीस बजावून, सुनावणी घेऊन त्यांचे दुकाने पाडून त्यांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्न करीत असल्याने मनपा आयुक्तांच्या हेतूवर विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही कार्यवाही तत्काळ बंद करावी, अन्यथा लॉकडाउन असेल किंवा नसेल याची कोणतीही तमा न बाळगता काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या कार्यवाहीचा तीव्र विरोध करण्यात येईल, असा अशा इशारा पठाण यांनी दिला होता.त्यानंतर मनपा प्रशासनाने सुनावणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.