Crime
sakal
अकोला - उपचारादरम्यान निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून अकोल्यातील गोरक्षण रोडवरील वत्सल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या दोन डॉक्टरांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर ४ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. डॉ. नरेंद्र अरुण भागवत आणि डॉ. नम्रता भागवत अशी आरोपी डॉक्टरांची नावे आहेत.