Fire at the meter room in the hostel with GM !, averted a major accident
Fire at the meter room in the hostel with GM !, averted a major accident

जीएमसीत वसतीगृहातील मीटर रुमला आग!, मोठी दुर्घटना टळली

Published on

अकोला  ः सर्वोपचार रुग्णालय परिसरातील वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वसतीगृहातील मीटर रुमला शुक्रवारी (ता.२६) सकाळी आग लागल्याची घटना घडली. आगीत मीटर जळाले; मात्र वेळीच घेतलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.


सर्वोपचार रुग्णालयात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आहे. अशातच शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयातील वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वसतीगृहातील मीटर रुमला आग लाग्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्गघटना टळली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे पथक घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणला देण्यात आल्याची माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने केली पाहणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com