लेडी हार्डिंगमध्ये तोंडांच्या कॅन्सरची पहिली शस्त्रक्रिया

भगवान वानखेडे 
Thursday, 20 August 2020

जिल्ह्यातील एका 45 ते 50 वर्षीय महिलेला जिभेवर गाठ होती. तिने आधी खासगी रुग्णालयामध्ये विविध तपासण्या केल्यात. योग्य ते निदान लागत नव्हते.

अकोला ः जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) तोंडाच्या कॅन्सरची पहिली शस्त्रक्रिया पार पडली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर ही शस्रक्रिया करण्यात आली.

जिल्ह्यातील एका 45 ते 50 वर्षीय महिलेला जिभेवर गाठ होती. तिने आधी खासगी रुग्णालयामध्ये विविध तपासण्या केल्यात. योग्य ते निदान लागत नव्हते. अशातच या महिलेच्या भाच्याने सर्वोपचार रुग्णालय गाठले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गंत फाईल तयार करून या महिलेच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये योजनेच्या जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे यांनी रुग्ण महिलेची शस्त्रक्रियेसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. रुग्ण महिला दाखल झाल्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी जळगाव खांदेश येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक यांचा वेळ घेऊन रुग्ण महिलेच्या तोडांच्या कॅन्सरची पहिला शस्त्रक्रिया पार पडली.

सर्वसामान्यांनी या घाबरून न जाता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आधी समजून घ्यावी, आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. सोबतच खासगीसह शासकीय रुग्णालय अधिक सक्षम झाल्यास ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यास मदत होईल.
-डॉ. अश्विनी खडसे, जिल्हा समन्वय अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first surgery for oral cancer in Lady Harding