
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वितरण योजनेला दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरात व बाजारात पोहचल्यानंतर सुद्धा अद्याप ४ हजार ९८६ शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सदर योजनेसाठी ९००६ लाभार्थी निवडीचे लक्षांक ठेवले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५ हजार २० लाभार्थ्यांच्याच खात्यात ६३ लाख ९३ हजार ४८२ रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वितरण योजनेला दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरात व बाजारात पोहचल्यानंतर सुद्धा अद्याप ४ हजार ९८६ शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सदर योजनेसाठी ९००६ लाभार्थी निवडीचे लक्षांक ठेवले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५ हजार २० लाभार्थ्यांच्याच खात्यात ६३ लाख ९३ हजार ४८२ रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २ कोटी ४ लाख २५ हजार रुपयांच्या योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा सुद्धा समावेश आहे. पावसाळा तोंडावर असतानाच सदर योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रिया रखडली होती. परंतु जून महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना कपाशी बीजी-२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदानावर देण्याच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत योजनेसाठी १ कोटी १८ लाख ४३ हजार रुपयांची भरिव तरतूद करण्यात आली. त्यामुळे ९ हजार ६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे लक्ष सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने ठेवले होते. शेतकऱ्यांकडून बिल अप्राप्त हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच अशी आहे स्थिती (संपादन - विवेक मेतकर) |
|||