Akola : विनयभंग करणाऱ्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

विनयभंग करणाऱ्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास

अकोला : अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला पास्को कायद्याअंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ८० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनअंतर्गत राहणाऱ्या एका १५ वर्षे वयाच्या मुलीने ता. १५ जानेवारी २०१६ रोजी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. ती घरून बिस्किटे आणण्यासाठी जात असता सुदेश किराणा दुकानाजवळ संदेश उर्फ भुऱ्या अशोक शेगोकार हा दारू पिऊन येत होता. त्याने एकदम हात पकडून विनयभंग केला आणि शिविगाळ करून धमकी दिली.

या तक्रारी वरून शेगोकारविरुद्ध पोलिस स्टेशन सिव्हिल लाइन्स अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणिती लांजेवार यांनी करून दोषारोप न्यायालयात दाखल केले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकंदरीत सात साक्षीदार तपासण्यात आले. बचावासाठी एक साक्षीदार तपासला. सरकार पक्षातर्फे सादर केलेला साक्षपुरावा ग्राह्य मानून शेगोकारला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. संदेश उर्फ भुऱ्या अशोक शेगोकार हा सव्वा वर्षांपासून कारागृहात आहे.

loading image
go to top