esakal | बर्लिनमध्ये फडकला अकोल्याचा झेंडा! मायलेकाने पार केले नियोजित अंतर | Akola
sakal

बोलून बातमी शोधा

 सौ. अपर्णा पाटील व शर्व रणजीत पाटील

बर्लिनमध्ये फडकला अकोल्याचा झेंडा! मायलेकाने पार केले नियोजित अंतर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जर्मनितील बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पातळीवरील मॅराथानमध्ये अकोल्याच्या सौ. अपर्णा पाटील व शर्व रणजीत पाटील या मायलेकांनी नियोजित वेळेत ४२ किलो मिटर अंतर पार करत बर्लिनवर यशाचा झेंडा फडकविला आहे. यावेळी त्यांना आयोजकांतर्फे अवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले.

राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या पत्नी सौ. अपर्णा पाटील व चिरंजीव शर्व रणजीत पाटील यांनी जर्मिनीतील बर्लिन येथे आयोजित जागतिक मॅराथॉनमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेत जगभरातून ५० हजाराच्या जवळपास स्पर्धक सहभागी झाले होते.

हेही वाचा: २५ वर्षीय तरुणाचा विधवेवर बलात्कार, एकटी राहत असल्याचा गैरफायदा

ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर नियोजित वेळेत ४२ किलो मिटर अंतर पार करीत डॉ. सौ. अपर्णा पाटील व शर्व पाटील यांनी अवार्ड आपल्याकडे खेचून आणले.

ही स्पर्धा २६ सप्टेंबर २०२१ रोजी बर्लिन येथे पार पडली. येथे जाण्यापूर्वी शर्व पाटील यांनी मुंबई येथे आयोजित मॅराथान स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर सतत सराव करत शर्वने ही स्पर्धा यशस्वीरित्या जिंकून राज्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविले. त्याची आई सौ. अपर्णा पाटील यांनीच त्याला धावण्याच्या शर्यतीचे धडे दिले आहेत. या मायलेकांनी जागतिक पातळीवर मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

loading image
go to top