अकोला - अकोला शहरात धक्कादायक प्रकार घडला असून, वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या नेत्या यांच्या १२ वर्षीय नातीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. कृषी नगर येथील नामांकित इंग्रजी शाळेच्या परिसरातून हे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संशयितांकडे चौकशी करण्यात येत आहे.
पोलीस तपास वेगवान
अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत पाच ते सहा संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलीस अधीक्षक बच्चनसिंग आणि ठाणेदार जयवंत सातव यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांना निर्देश दिले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, घटनास्थळाचा बारकाईने आढावा घेतला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धडक दिली आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढाव, जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, प्रभाताई शिरसाठ, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, गजानन गवई, मंदाताई शिरसाट, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, मनोहर बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनीही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरजी शेळके व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून तपास वेगवान करण्याची मागणी केली.
शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ
अकोला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारांवर तातडीने नियंत्रण मिळवावे आणि टवाळखोरांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.