अकोला - संभाजी ब्रिगेड पक्षाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी यांना एका महिलेने सार्वजनिक ठिकाणी चप्पलने बेदम मारहाण केल्याचा प्रकार मुर्तीजापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. छेडछाडीचा आरोप करीत ही मारहाण करण्यात आली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही.