

मलकापूर : स्क्रॅपींगच्या व्यवहारासाठी दसरखेड एमआयडीसी येथे आलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्याचे अपहरण करीत ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना दसरखेड (मलकापूर) एमआयडीसी पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून अटक करीत अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुटका केली.दसरखेड एमआयडीसी येथे गुजरातच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना मलकापूर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली.