esakal | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी चार रेल्वेगाड्या रद्द

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी चार रेल्वेगाड्या रद्द

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी चार रेल्वेगाड्या रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या असून कडक निर्बंधांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चार रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

गाडी क्रमांक ०१०५७ डाउन मुंबई-अमृतसर ही गाडी २० एप्रिल पासून सुरू होणार होती, परंतु तिला रद्द करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०१०५८ अमृतसर-मुंबई विशेष गाडी २३ एप्रिल पासून सुरू होणार होती,

परंतु ती पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१२५१ पुणे-काझीपेठ गाडी २३ एप्रिल पासून सुरू होणार होती, परंतु ती पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१२५२ काजीपेठ-पुणे विशेष गाडी २५ एप्रिल २०१९ पासून सुरू होणार होती. परंतु ती पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.