Akola News : बाफणा ट्रेडिंग कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; बाजार समिती सचिवांनी मागितला खुलासा

कृषि उत्पन्न बाजार समिती अकोलाचे जैन हे परवानाधारक अडते असुन अडत व्यवसाय करणे करीता अडत परवाना दिला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती अकोलाचे जैन हे परवानाधारक अडते असुन अडत व्यवसाय करणे करीता अडत परवाना दिला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती अकोलाचे जैन हे परवानाधारक अडते असुन अडत व्यवसाय करणे करीता अडत परवाना दिला आहे.Sakal
Updated on

Akola News : शेतकऱ्यांच्या शेतमालामधील शेतमाल काढून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कृउबास सचिवांनी बाफणा ट्रेडिंग कंपनीचे प्रो.प्रा. दिलीप जैन (परवानाधारक अडते) यांना लेखी खुलासा मागितला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती अकोलाचे जैन हे परवानाधारक अडते असुन अडत व्यवसाय करणे करीता अडत परवाना दिला आहे. शेतक-याने अडत मध्ये विक्रीस आणलेल्या शेतमालाचे अचुक मोजमाप करुन त्यांचे शेतमाला मध्ये कुठलेही वजन फरक अथवा भाव फरक होणार नाही व शेतमालाचे योग्य मोजमाप करुन सदर शेतमालाची रक्कम अदा करणे ही त्यांची जबाबदारी आहे.

मात्र १७ मेरोजी त्यांच्या अडतमध्ये संजय पांडुरंग बाजड रा. नेतनसा या शेतक-याने पूर्ण विश्वसाने आपल्या अडत मध्ये शेतमाल विक्रीस पाठविला असतांना त्यांचे योग्य व अचुक मोजमाप करणे आपली जबाबदारी आहे.

परंतु आपल्या अडत मध्ये सदर शेतक-याचे तुर शेतमालामधुन एक कट्टा तुर शेतक-याला कुठलीही माहीती नसतांना परस्पर बाहेर काढुन ठेवले असल्याचे निदर्शनास आले असुन शेतक-याची फसवणुक करण्यात आली.

हे कृत्य बाजार समिती नियम व कायद्याचे उल्लंघन करणारी असुन शेतक-याच फसवणुक करणारी आहे. सदर बाब आपण अडत परवाण्या सोबत करुन दिलेल्या करारनामा व वचनपजचे उल्लंघन करणारी असल्याने आपला अडत परवाना महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्र (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ८ (ब) अधिन रद्द बाबत कार्यवाही का करण्यान्न ये नये?

याचा खुलासा त्वरीत कार्यालयात सादर करावा खुलासा समाधान कारक नसल्यास नियमानुसा पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस सचिवांनी दिलीप जैन यांना दिली आहे. या संदर्भात दिलीप बाफणा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बाफना ट्रेडिंग कंपनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट व पिळवणूक करीत आहे. मी सुद्धा यापूर्वी बाफना ट्रेडिंग कंपनीने माझी फसवणूक केली. अशी तक्रार अकोला उपनिंबधक कार्यालयामध्ये सादर केली असून त्याची चौकशी सुरू आहे. माझा शेतमाल जास्त भावाने विकला असून मला कमी भावाने पैसे अदा केले आहे. यापूर्वी सुद्धा बाजार समितीमध्ये अश्याच प्रकारे शेतमाल चोरीच्या घटना घडल्या आहेत बाजार समितीने बाफना ट्रेडिंग कंपनी वर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.

- नंदकिशोर शिवराम कापकर, शेतकरी. रा. आलेगाव ता पातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com