‘चिमूर’च्या स्वातंत्र्यात दडलेय राष्ट्रसंतांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान | Akola news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashtrasant tukdoji maharaj
‘चिमूर’च्या स्वातंत्र्यात दडलेय राष्ट्रसंतांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

‘चिमूर’च्या स्वातंत्र्यात दडलेय राष्ट्रसंतांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

मूर्तिजापूर : राष्ट्रसंतांच्या क्रांतीकारक विचारांच्या(rashtrasant tukdoji maharaj) स्फुल्लींगामुळे विदर्भातील चिमूर हे गाव देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १९४२ मध्ये स्वतंत्र होणे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’, सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे अभ्यासपूर्ण प्रतिपादन मोझरीच्या गुरूकूंज आश्रमातील प्रा.अरविंद राठोड यांनी येथे केले.

स्वामी विवेकानंद मंचच्या(swami vivekanand) वतीने येथील राधामंगलम सभागृहात आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रसंत तुकडोजींचे योगदान’(rashtrsant tukdoji maharaj) या विषयावर गुंफतांना ते बोलत होते. आपल्या दीड तासाच्या ओजस्वी व्याख्यानाची सुरवात करतांनाच त्यांनी जगाला अध्यात्माचा संदेश देणाऱ्या महामानव स्वामी विवेकानंदांचा वारसा राष्ट्रसंतांनी निरंतर चालविल्याचे नमुद केले. स्वामीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याकडे अग्रेसर झालेल्या राष्ट्रसंतांनी १९३५ साली स्वातंत्र्यासाठी संघटन कार्य हाती घेत सालबर्डीत न भूतो नं भविष्यती असा यज्ञ केला. संस्कृती हा विस्तारवादी विचार पटवून दिला.

हेही वाचा: किरण माने प्रकरण चिघळलं... 'त्या' भेटीनंतर मालिकेचं शूटिंग रोखण्याची नोटीस

कलीयुग कीर्तन साधना असल्याचे मनोमन स्वीकारत केलेल्या यज्ञातून ‘सब की भलाई धर्म मेरा’, हा संदेश दिला. माध्यम यज्ञाचे पण, लाखो लोक संघटीत झाले. उठ आर्यपूत्रा कर सामुदायी प्रार्थना, ही हाक दिली. त्यादरम्यान गांधीजी वर्धेत आले होते. कुणीतरी कागाळी करायची म्हणून गांधीजींना ही माहिती दिली. परिणाम विपरित झाला. गांधीजी समजले. हे संघटन स्वातंत्र्यलढा बलवान करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार हे हेरून १९३६ मध्ये पत्र देऊन राष्ट्रसंतांना बोलावलं. राष्ट्रसंत कामाला लागले आणि आष्टीला पहिलं आरती मंडळ स्थापन झालं. ६५०० अभंग लिहिले, १८५० श्लोकांची ग्रमगीता लिहिली व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठी ही माध्यमे वापरत संघटना बांधणीतून वाटचाल करीत, परंपरेला फाटा न देता परंपरेचा धागा पकडून देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात आहुती देण्यासाठी भजनांतून राष्ट्रसंतांनी जनमानस तयार केल्याचे व ‘झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बाँब बनेगे, नाव लगेगी किनारे’, असा ब्रिटीशांना दम भरल्याचे प्रा.राठोड यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा: Nagpur Corona Update | कोरोनाचे भय वाढले!

...अन् फडकविला तिरंगा

विदर्भातील चिमूर (vidarbha chimur )ब्रिटीशांविरुद्ध(british) पेटून उठले. तेथील पोलिस ठाणे, तहसील कार्यलयावरील युनियन जॕक उतरवून तिरंगा फडकविल्या गेला आणि स्वतंत्र होणारे चिमूर हे देशातील पहिले गाव ठरले. त्यानंतर महाराजांसह असंख्य क्रांतीकारकांना अटक झाली, हे वास्तव प्रखरपणे मांडत रायपुरातील कारागृहात आसतांनाच ‘अब तो आया है स्वराज अपना सुंदर देश बनाओ’, असे आवाहन करणाऱ्या राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यानंतरही ‘तन मन धन से सदा सुखी हो... विजयी हो शानदार हो मेरा भारत, या शब्दात स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर होण्याची अपेक्षा राष्ट्रसंतांनी राष्ट्रवंदनेतून व्यक्त केल्याचे प्रा.राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोनाबाधित शिक्षकांना रजेची सवलत! पाचवी, आठवीची 'Scholarship' फेब्रुवारीत

जनसामान्यात देशभक्ती रुजविली

अनेक संघटना, भजनं, सामुदायिक प्रार्थना, देश हा देवची पवित्र, असे मानत ‘भावभक्ती को मुडा लिया राष्ट्रसेवाही प्रभुसेवा बना लिया’, असे निष्ठून सांगत गांधीजींच्या ‘चलेजाव’च्या इशाऱ्यानंतर सर्व नेते गजाआड झाले. तेंव्हा १९४२ मध्ये राष्ट्रसंत सर्वार्थाने समोर आले. विदर्भात आष्टी, चिमूर यावलीत त्यांनी नेतृत्व केले. ‘मै कर्मयोगी हूँ मुझे बेकार से घृणा... सबकोही करना काम अपने उचित कर्तव्य... सुंदर बनाना देशको है... मै शब्द की खैरात हूँ... मुर्दे जगा दू शब्द से होती अशूभ की राख है’, अशी जाज्वल्य देशभक्ती जनमानसात रुजविली.

Web Title: Freedom Battle Of Chimur National Leader Contrabution Know About It

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top