

मलकापूर : रागाच्या भरात मित्रानेच मित्राचा रूमालाने तोंड दाबून खून केल्याची घटना ता. १६ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृतकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एकास अटक करीत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तर आज आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.