Success Story : पाचवीत शाळा सोडलेला ‘बाळू’ झाला सरकारी बाबू; सर्वत्र कौतूक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले यश
Struggle To Success : टाकळी येथील रामचंद्र उर्फ बाळू राजाराम बुंदे याने गरीबीच्या आव्हानांना मात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट 'क' परीक्षेत यश मिळवून सरकारी लिपिकाची नोकरी मिळवली. केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या युवकाने मेहनत आणि जिद्द दाखवून आपले जीवन बदलले.
मोताळा : तालुक्यातील टाकळी येथील रामचंद्र उर्फ बाळू राजाराम बुंदे यांचे आयुष्य खरेतर आरसाच आहे. केवळ पाचवीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेला हा युवक आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘क’ परीक्षेत यश मिळवून सरकारी लिपिक बनला आहे.