
बुलडाणा : अवयवदाना विषयी जागरूकता करणे, अवयव दानाशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी नागरिकांना मृत्यूनंतर उपयोग आणि उती दान करण्यास प्रेरित करणे, त्याचबरोबर इतर जागृतीपर उपक्रम राबविणे याबाबत केंद्र शासन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, स्तरावरून सूचना प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात हे अभियान यशस्वी राबविण्यात बाबतच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी अधिकारी कर्मचारी यांना दिल्या आहेत.