.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अकोला : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गोपाल दातकर यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसांत अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व अर्ज दाखल करण्यात आला होता, यावर न्यायालयाने अनेक महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवीत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच पोलिसांना २ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले.