Hemant Sapkal
sakal
अकोला - पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेसाठी हेमंत प्रफुल्ल सपकाळ (वय-२९, रा. मोठी उमरी, अकोला) याचा नरबळी दिल्याचा खळबळजनक आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. विवेक ऊर्फ विक्की शिंदे या कथित मांत्रिकाने साथीदारांच्या मदतीने हेमंतचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त करीत मृताचा भाऊ मुकुंद सपकाळ यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील अघोरी पूजेचे कथित व्हिडिओ समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.