
मूर्तिजापूर (जि. अकोला) : काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पामुळे (katepurna barage project) बाधित होणाऱ्या जांभा बुद्रुक गावाच्या (jambha budruk village of murtijapur) पूर्णतः पुनर्वसनासाठी आंदोलक भूमिका घेणाऱ्या जांभा बुद्रुकच्या ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारत आजपासून गावात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय शुक्रवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केला. (government employees not allow to enter in jambha budruk of murtijapur)
गेली १२ वर्षे रखडलेल्या काटेपूर्णा नदीवरील मंगरूळ कांबे येथील बॅरेज प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या या गावाचे शासन दफ्तरी अंशतः पूनर्वसन प्रस्तावित आहे. शासन दफ्तरी ६३ कुटुंबांची घरे बाधित होत असून त्यांच्या मालमत्तेचे संपादन झाले असून मोबदला देऊन त्यांना भूखंड वाटपही झाले आहे. गेल्या २४ मार्चच्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रकल्पाची सुप्रमा सुद्धा मान्य झाली आहे. ५३३ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे चार हजार १७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम प्रचंड रखडले आहे. पूर्ण झाल्यानंतर त्यात ७.७९९ दशलक्ष घनमीटर जलसाठा होईल. या प्रकल्पामुळे गाव अंशतः नाही, तर पूर्णतः बाधीत होत आहे. सन २०१० मध्ये अकोला पाटबंधारे विभागाच्या तत्कालिन कार्यकारी अभियंत्याने आमच्या जांभा बुद्रुक गावाचे १०० टक्के पुनर्वसन होत आसल्याचे पत्र देऊन गावातील विकास कामे ठप्प केली होती. ती अद्याप ठप्प आहेत. आमच्या गावात १०० फुटापर्यंत माती असल्यामुळे दलदल निर्माण होऊन घरे क्षतिग्रस्त होऊ शकतात. गावाभोवताल पाणी राहाणार आसल्यामुळे आम्ही भयभीत आहोत. सन २०१० पासून आम्ही सतत संबंधितांकडे पाठपुरावा करीत आहोत; मात्र आमची फक्त समजूत काढण्याशिवाय पदरात काहीच पडले नाही, अशी आपबिती यावेळी ग्रामस्थांनी कथन केली.
गावाच्या १०० टक्के पुनर्वसनासाठी एकत्रित आलेल्या ग्रामस्थांनी मारोती मंदिर परिसरात आठवडाभरापूर्वी घेतलेल्या बैठकीत सर्वसमावेशक संघर्ष समिती गठीत केली असून, पूर्णतः पुनर्वसन न झाल्यास रॅली, रास्ता रोको, शोले पद्धतीचे आंदोलन, आत्मदहन असे टप्प्याटप्याने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. उद्यापासून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा पहिला टप्पा अंमलात आणला जाईल, असा निर्णय यावेळी संतप्त ग्रामस्थांनी जाहीर केला. विठ्ठलराव ठोकळ, बाळासाहेब ठोकळ, सुनिल जाधव, आशीष गावंडे यांच्यासह सुमारे १०० ग्रामस्थ पत्रपरिषदेला उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.