
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांचा ४२७ वी जन्मोत्सव मोठ्या थाटात रविवारी (ता.१२) साजरा होत आहे. त्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी सज्ज झाली आहे. सूर्योदयाला राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या महापूजेने सोहळ्याची सुरुवात होणार आहे.