पुलावरून दोघे गेले वाहून; आजोबाचा मृतदेह सापडला, नातू अद्यापही बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News

पुलावरून दोघे गेले वाहून; आजोबाचा मृतदेह सापडला, नातू अद्यापही बेपत्ता

Akola Crime News अकोट (जि. अकोला) : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहे. त्यातच मंगळवारी पहाटे अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील आजोबा व नातू मोहाळी नदीचा पूल ओलांडताना वाहून गेले. आजोबाचा मृत्यू (Death) झाला तर नातवाचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील प्रभाकर प्रल्हाद लावणे (६२) हे नातू आदित्य विनोद लावणे (११) याच्यासोबत मंगळवारी पहाटे म्हैस घेऊन सोनबर्डी येथे गेले होते. परतीच्या मार्गावर असताना मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहाळी नदी दुथडी वाहत होती. पुलावरूनही पाणी वाहत होते.

हेही वाचा: सनी लिओनी झाली गुलाबी; पहा सुंदर फोटोशूट

तरीही आजोबा व नातवाने पुलावरून जाण्याचे धाडस केले. हेच धाडस त्यांच्या अंगलट आले. नातू आदित्य हा नदीच्या प्रवाहात वाहून जात होता. त्याला वाचवण्याचा आजोबांनी प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने आजोबा देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती तांदुळवाडी गावकऱ्यांना मिळताच नदीकाठी गर्दी केली.

शोध घेत असताना आजोबा प्रभाकर लावणे यांचा मृतदेह (Death) हाती लागला आहे. तर नातू आदित्य बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे. माहिती मिळताच लावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंब नदीच्या स्थळी दाखल झाले आहे. पुराच्या पाण्यात आजोबा आणि नातू वाहून गेल्यामुळे तांदुळवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

नागरिकांचा प्रशासनावर रोष

तांदुळवाडी सोनबर्डी नदीच्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी पूल पाण्याखाली जातो. सोनबर्डी व तांदुळवाडी वाहतुकीसाठी हाच एकच पर्याय असल्याने अनेकदा नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामधून जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच दोघे वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोनबर्डी व तांदुळवाडी रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाने काम सुरू केलेले नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Grandfather Death Grandson Missing Crime News Akola District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaCrime News