नवरदेवाच्या गायनाने मंडपातील वऱ्हाडीही भारावले!

आता नवरदेव बोहल्यावर चढणार, हे प्रत्येकाच्या मनी असतांना नवरदेव थेट माईक हातात घेतो आणि आपल्या सुमधुर आवाजात भावगीत सादर करतो.
marriage
marriagesakal
Summary

आता नवरदेव बोहल्यावर चढणार, हे प्रत्येकाच्या मनी असतांना नवरदेव थेट माईक हातात घेतो आणि आपल्या सुमधुर आवाजात भावगीत सादर करतो.

वाशीम - लग्नघटिकेची वेळ, सारा मंडप वऱ्हाडींनी भरलेला, समोर सुमधुर आवाजात संगीतमय गीतांचा (Song) स्वर आळवतो... आता नवरदेव (Groom) बोहल्यावर चढणार, हे प्रत्येकाच्या मनी असतांना नवरदेव थेट माईक हातात घेतो आणि आपल्या सुमधुर आवाजात भावगीत सादर करतो. नवरदेवाने केलेल्या गायनाने अवघा मंडप (Mandap) डोलू लागतो. हा विलक्षण प्रसंग रविवारी (ता. २६) पूर्णा तालुक्यातील फुकटगाव येथे पार पडलेल्या दिव्यांग दाम्पत्याच्या विवाह सोहळ्यात घडून आला.

फुकटगाव येथील दिवंगत रोहिदास बोकारे यांची कन्या चि. विश्रांती आणि गौर येथील स्व. मुंजाजी जोगदंड यांचा मुलगा दशरथ हे दोघेही दिव्यांग. दोघांचाही विवाह ठरला. नवरदेव दशरथ हा चेतन सेवांकुर आर्केस्ट्रातील गायक आहे. रविवारी दुपारी या दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी सारा गाव एकत्र आला होता. यावेळी फुलांच्या वर्षावात थाटात वधू-वरांना मंचावर आणण्यात आले. खुर्चीवर बसल्यानंतर मंगलाष्टकास सुरुवात होणार होती व ही मंगलाष्टके चेतन सेवांकूर आर्केस्ट्राचे कलावंतच सादर करणार होते.

marriage
अकोला : शिक्षकांनी फोडले प्रचाराचे नारळ; पॅनलमध्ये सामना!

मंगलाष्टके सुरू करण्यापूर्वी सूत्रसंचालनकर्ते हनुमान बोकारे हे वधू-वरांचा परिचय करून देतांना नवरदेव दशरथ हे चेतन सेवांकूर आर्केस्ट्राचे प्रमुख गायक असून ते नुकत्याच सोनी मराठी चॅनेलवर पार पडलेल्या लोकप्रिय इंडियन आयडॉल स्पर्धेत सहभागी झाल्याचे सांगितले व दशरथ हे सर्वांसमोर एक भावगीत सादर करणार असल्याचे जाहीर केले. ही विनंती नवरदेवाने क्षणाचाही विलंब न करता मान्य केली व बाशिंग बांधून तयार असलेल्या दशरथ आपल्या सुमधुर आवाजात सुंदर असे भावगीत सादर केले. मंडपातील वऱ्हाडीही नवरदेवाच्या गोड आवाजात तल्लीन झाले होते. त्यानंतर मंगलाष्टके होऊन विवाह सोहळ्याची सांगता होते.

कलावंतासाठी आपली कला म्हणजे जीव की प्राण असतो. तो आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी एकही संधी सोडत नाही. नवरदेव दशरथ यांनीही आपला विवाह असला तरी कलेचा आदर करून गीतगायन केल्यामुळे त्यांचे आपल्या कलेवरील अतूट प्रेम वृद्धिंगत झाले आहे. एका दिव्यांग जोडप्यांच्या विवाह सोहळ्यात अश्याप्रकारे वराच्या कलेला प्रस्तुत करण्याची संधी लाभल्यामुळे या सोहळ्याच्या आनंदाला विलक्षण भरती आली होती. या सोहळ्याची चर्चा दिवसभर वऱ्हाडी मंडळीमध्ये सुरू होती. या विवाहास वाशीम येथील माजी मुख्याधिकारी अढागळे, दिनकर सुरुसे,सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com