esakal | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे आहे; शेतकऱ्यांनी खचून जावू नये
sakal

बोलून बातमी शोधा

The Guardian Minister Dr. Rajendra Shingane saidThe government stands firmly behind the farmers.

एकदा सोयाबीन उभे असतांना अतिवृष्टीच्या पावसाने तर दुसऱ्यावेळेस काढणीच्या वेळेस नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काळवंडलेली आहे व ओलावा असल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटामध्ये सापडला आहे. 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे आहे; शेतकऱ्यांनी खचून जावू नये

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (बुलढाणा) : सिंदखेड राजा तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथील तापडिया भुसार मार्केटमध्ये जावून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पाहणी केली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ७८ हजार १०० हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून खरीप हंगामामध्ये ६३ हजार ६२३ हेक्‍टरवर शेतकऱ्याने लागवड केली होती. त्यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन ३४ हजार ५५७ हेक्टर, कापूस २१ हजार १७४ हेक्टर, तूर ४ हजार १३७ हेक्टर, मुग १ हजार ७१३ हेक्टर १ हजार ५७६ हेक्टर  लागवड करण्यात आली होती. तालुक्यामध्ये अतिदृष्टीमुळे व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्यामध्ये नदीकाठच्या ८०० हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली होती. तर सोयाबीन पिकांची २५ हजार हेक्टरच्या वर नुकसान झाले आहे तर कापसांचे एक हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटामध्ये सापडला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले आहे. एकदा सोयाबीन उभे असतांना अतिवृष्टीच्या पावसाने तर दुसऱ्यावेळेस काढणीच्या वेळेस नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काळवंडलेली आहे व ओलावा असल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटामध्ये सापडला आहे. 

सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथील तापडिया भुसार मार्केटला अचानक भेट देवून त्या ठिकाणाच्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.  शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मांडल्या. एका बाजूला कोरोनासारख्या महामारी रोगाला सर्वच जणाला सामोरे जावे लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला  शेतकऱ्यांना अतिवृष्टी व मान्सूनच्या पावसाचे अस्मानी संकट उभे राहिले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्तर मोठ्याप्रमाणात खालावला आहे. त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.  

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे मदत मिळवी, यासाठी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यासाठी सुचना दिल्या असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पावसाने नुकसान झाल्यामुळे खचून जावू नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, राम राठोड, बाबुराव राजे जाधव, प्रमोद काकड, रामेश्वर काकड, सचिन राजे, पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 
सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकरी हवालदिल असल्यामुळे शेतकऱ्यांना १००टक्के मदत करण्यासाठी तहसीलदार सुनील सावंत यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सुचना दिल्या आहेत.

बुलढाणाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  म्हणाले,  जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जावून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  पंचनामे प्रशासनाकडून पुर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून  न जाता आलेल्या आसमानी संकटाला सामोरे जायचे आहे.  शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले