Shegaon News : टक्कल झालेल्या नागरिकांच्या डोक्यावर आलेत पुन्हा दाट केस
Hair Regrowth : शेगाव तालुक्यात काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्हायरसने नागरिकांचे केस गळवले होते. मात्र आता त्याच नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा दाट केस उगवले आहेत, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शेगाव : मागील काही महिन्यांपूर्वी शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अज्ञात टक्कल व्हायरसने खळबळ उडाली होती. या व्हायरसच्या संसर्गामुळे अनेक नागरिकांच्या डोक्यावरील केस पूर्णतः गळून गेले होते, मात्र अशा नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा दाट केस आले आहेत.