
अकोला,ः कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी टाळेबंदी शिथीलतेमध्ये वाईन शॉप मालकांनी आॅनलाइन मद्यविक्री करावी असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश असतानाही खदान पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या गोरक्षण रोडवरील एका वाईन शॉप मालकाने चक्क काऊंटरवरूनच मद्यविक्री सुरू केली होती. हा प्रकार खदान पोलिसांच्या लक्षात येताच बुधवारी (ता.3) सापळा रचून त्या वाईन शॉप मालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागातील वाईन शॉप मालक आॅनलाईन पद्धतीने मद्यविक्री करू शकतात असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमीत केले होते. या आदेशाचे पालन तंतोतंत करून घेण्यासाठी पोलिस सर्व बाबींवर लक्ष ठेवूनही आहेत. मात्र, खदान पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या गौरक्षण रोडवरील सुनिल वसंत सुलताने याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत काऊंटरवरच मद्यविक्री सुरू केली होती. ही माहिती पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांना कळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडून मद्य खरेदी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी सुनिल वसंत सुलताने याच्याविरुद्ध कलम 188, 269 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
काऊंटरवरून दारू विक्री कराल तर खबरदार
दारू विक्री आॅनलाइन पद्धतीने करावी असे आदेश असतानाही जर कोणी काऊंटरवरून दारू विक्री करीत असेल तर अशांची आता खैर नाही. कारण खदान पोलिसांनी अशा वाईन शॉप मालकांवर लक्ष ठेवणे सुरू केले असून, कोणाचीच गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.