
शेगाव : येथील अनुसुचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थिनींना भोजन पुरवठा व दुध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे बिले काढण्यासाठी ६० हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक शिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका सीमा प्रभाकर वनकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.