
कारंजा : शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे वाशिम, कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयावर १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला.