Akola : आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २२) दुपारी जिल्हा परिषदेत धडक दिली. यावेळी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी अर्थात डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निवेदन देण्यात आले व संबंधित समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.

यासंबंधिच्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की कोविड लसीकरणामुळे सर्वच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या ड्युट्या ह्या मुख्यालय सोडून लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे एनपीसीडीसीएस अर्थात एसीडी स्क्रिनिंग व डेटा एंट्रीचे काम कमी प्रमाणात दिसून येत आहे. इतर ठिकाणी ड्युटी करावी लागत असल्याने हा प्रकार होत आहे. मुख्यालय सोडून इतर ठिकाणी ड्यूटी लावण्यात येत असल्याने इतर कामांचे मासिक टार्गेट पूर्ण अपूर्ण राहत आहे. त्यामुळे सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रत्येक महिन्याला १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक किंवा दोन डेटा एंट्री ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी. समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांना अद्याप कामावर आधारित मोबदला अर्थात पीएलपी मिळालेला नाही. त्यामुळे सर्वांना पीएलपी देण्यात यावा या व इतर मागण्यांचा उल्लेख निवेदना करण्यात आला आहे. निवेदन देते वेळी संघटनेचे डॉ. अविनाश पवार, डॉ. अभिलाष टेकाडे, डॉ. जमील खान, डॉ. निल चांभारे, डॉ. प्रिती लहाने, डॉ. रचना सावळे-वेलकर, डॉ. पूर्वा पाटील, डॉ. इकबाल इनामदार, डॉ. पावन अडबोल, डॉ. भूषण नवघरे व समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

loading image
go to top