Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

एप्रिलच्या मध्यातच अकोल्यात उन्हाची तीव्रता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.
akola city road empty by summer heatwave

akola city road empty by summer heatwave

sakal

Updated on

- श्रीकांत राऊत

अकोला - एप्रिलच्या मध्यातच अकोल्यात उन्हाची तीव्रता धोकादायक पातळीवर पोहोचली असून या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जुने शहरातील दगडी पुलाजवळील अगरवेस परिसरात बुधवारी (ता.१५) एका टेम्पोमध्ये ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या मृत्यूकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com