Monsoon Update : अकोला जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक कृषी निविष्ठांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून जिल्ह्यात आतापर्यंत २८.१५ टक्के पेरणी झाली आहे.
अकोला : महानगरासह ग्रामीण भागात बुधवारी रात्रभर पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. २६) सुद्धा सर्वत्र पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकऱ्यांची पाऊले कृषी निविष्ठ खरेदीकडे वळली आहेत.