
शिरपूर : वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हळद लागवड केली जाते. चालू हंगामात अतिवृष्टी झाल्याने पिकामध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे कंदकुज, मूळकूज व विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.