राज्यभरात धो-धो, जिल्हा कोरडा ठाक, गुरुवारी सकाळपर्यंत अकोल्यात अवघा 3 मि.मी. पाऊस

मनोज भिवगडे
Thursday, 6 August 2020

 राज्यात एकीकडे धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके तैनात करावी लागत आहे. दुसीकडे अकोला जिल्ह्यासह वऱ्हाडातील बहुतांश भागात कडक ऊन पडले आहे. अकोला जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी ३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

अकोला : राज्यात एकीकडे धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके तैनात करावी लागत आहे. दुसीकडे अकोला जिल्ह्यासह वऱ्हाडातील बहुतांश भागात कडक ऊन पडले आहे.

अकोला जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी ३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही राज्यात अद्याप सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस झाला नाही. कुठे धो-धो तर काही भाग कोरडाच असल्याचा अनुभव येतो आहे.

हवामान विभागाच्या वतीने पुढील ८ ऑगस्टपर्यंत राज्यात अतिवृष्टीची इशारा देण्यात आला. त्याप्रमाणे कोकण, मुंबई मराठावाड्यातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस झाला.

पूर्व विदर्भात नागपूर शहरामध्येच रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरुप आले आहे. अशा परिस्थितीतही पश्चिम विदर्भातील जिल्हे मात्र कोरडेच आहे. बुधवारी सकाळपासून ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असताना अकोला जिल्ह्यात मात्र कडक ऊन पडले होते.

जिल्ह्यात सरासरी ३.१ मि.मी. पावसाचीच नोंद झाली. त्यामुळे अद्यापही राज्यात सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षाच आहे. अकोला जिल्ह्यात पर्यजन्यमान कमी असल्यामुळे अकोट, तेल्हारा तालुक्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत. वाशीम जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे यावर्षी जुलैमध्येच काटेपूर्णा धरणाने सरासरीपेक्षा अधिक पातळी गाठली आहे.

सध्या या प्रकल्पात ८२.९६ टक्केच जलसाठा आहे. दुसरीकडे वाण प्रकल्पात ४२.०३ टक्के पाणी आहे. यापूर्वी यापेक्षा अगदी उलटी स्थिती जिल्ह्यात राहत होते. मात्र यावर्षी सातपुडा पर्वत रांगांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नसल्याने या भागातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसंचय अद्याप होऊ शकला नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्ह्यातील पर्यजन्यमान (मि.मी.)
 गुरुवारी सकाळी ८ पर्यंतची स्थिती
  तालुका गुरुवारचा पाऊस या मोसमातील टक्केवारी वार्षिक सरासरीच्या तुलनेत टक्केवारी गतवर्षीची टक्केवारी  
  अकोट ६.० ७८.२ ४४.८ ८०.८  
  तेल्हारा १.७ ८७.७ ४९.६ १०५.७  
  बाळापूर ०.५ ११६.७ ६७.० ९१.९  
  पातूर ०.० ११५.१ ६८.६ ६८.३  
  अकोला ५.९ ८२.६ ४६.७ ८४.०  
  बार्शीटाकळी ४.८ ६७.८ ३९.६ ५६.८  
  मूर्तिजापूर ०.३ ७४.२ ४३.० ७७.९  
  जिल्ह्याची सरासरी ३.१ ८६.५ ४९.९ ९४.३  

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavyrain in the state, akola District dry, Akola only 3 mm till Thursday morning