अरे हे काय? माजी आमदाराच्या मुलाने फेसबुकवरून मागीतले मित्रांना पैसे अन् नंतर कळले ते अकाऊंट तर... 

Hey whats up The son of a former MLA asked for money from his friends on Facebook akola marathi news
Hey whats up The son of a former MLA asked for money from his friends on Facebook akola marathi news

अकोला  ः बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा मुलगा मुकेश गव्हाणकर यांचे फेसबुक मेसेंजर हॅक करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील  अनेक मित्रांना पैश्याची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१८) दुपारी उघडकीस आली आहे. मात्र, फेसबुक खाते हॅक झाल्याची माहिती वेळीच कळल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी भाजप युवा नेते मुकेश गव्हाणकर यांनी सायबर सेल आणि सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.


   निमकर्दा येथील भाजपचे युवा नेते मुकेश गव्हाणकर यांचे फेसबुकवर खाते आहे. यासोबतच  फेसबुक मेसेंजर ही त्यांच्या मोबाइलमध्ये आहे. मात्र वेळेअभावी ते कधीच मेसेंजरचा वापर करत नाहीत. याचाच गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांचे हे मेसेंजर खाते हॅक केले आणि त्यांच्या मित्र यादीतील अनेकांना ‘मला आता तातडीने दहा हजार, वीस हजार रुपयांची आवश्यकता आहे, ऑनलाइन पाठवा’ किंवा हॅकरने मॅसेज केलेल्या नंबरवर पाठवा असे सांगितले. असे मॅसेज अनेकांना हॅकर कडून पाठवण्यात आले आहेत. अचानक मुकेश गव्हाणकर आर्थिक अडचणीत असल्याचा मेसेज आल्याने त्यांना खरोखरच पैशाची आवश्यकता असेल असे समजून अनेकांनी त्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर  पैसे पाठवण्याची तयारी केली होती.


  असाच मॅसेज अमर गव्हाणकर नागपूर येथील कंपनीत कार्यरत असून, त्यांना पैश्याची मागणी करणारा मेसेज आला. त्यांनी दहा हजार रुपये हॅकरच्या नंबर वर पाठवले. त्यानंतर अनेकांनी मुकेश गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधला. मुकेश गव्हाणकर यांनी लागलीच फेसबुकवरील मित्रांना माझे अकाऊंट हॅक झाले असून, आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास रक्कम देऊ नये असे मेसेज केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, मुकेश गव्हाणकर यांनी सायबर सेल आणि सिव्हिल लाईन्स ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी!
फेसबुक अकाउंटमधील मेसेंजर हॅक करून त्या माध्यमातून अनेकांना मेसेज करून पैश्यांची मागणी करण्यात आली. आता किती लोकांनी हॅकरच्या नंबर वर पैसे पाठवले हे माहीत नाही. कोरोनाच्या काळात हॅकर सक्रिय झाल्याने फसवणुक होऊ शकते म्हणुन नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन मुकेश गव्हाणकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com