

Eligible SC and ST farmers in Akola can apply online for horticulture scheme benefits.
esakal
अकोला: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकूण ७०.०८ लाख रुपयांचा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. या अभियानांतर्गत विविध फलोत्पादनविषयक घटकांसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.