esakal | हॉटेल तुषार, कार केअर पेट्रोल पंपाला प्रत्येकी १० हजारांचा दंड

बोलून बातमी शोधा

हॉटेल तुषार, कार केअर पेट्रोल पंपाला प्रत्येकी १० हजारांचा दंड
हॉटेल तुषार, कार केअर पेट्रोल पंपाला प्रत्येकी १० हजारांचा दंड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पश्चिम क्षेत्रातील राष्‍ट्रीय महामार्ग क्रं. सहा वरील होटेल तुषर सेलीब्रेशनमध्‍ये सुरू असलेल्‍या लग्‍न सोहळ्यात नागरिकांनी मास्‍क लावला आढळून आला नाही.

सोशल डिस्‍टन्सिंग नियमाचे उल्‍लंघन करत असल्‍याचे आढळून आल्‍याने होटेल तुषर सेलीब्रेशनच्‍या संचालक तुषर गोयनका यांच्‍यावर मनपा प्रशासनाव्‍दारे १० हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

याचसोबत अशोक वाटीका चौक वरील कार केअर पेट्रोत पंप यांच्‍याव्‍दारे लॉकडाउन नियमाचे उल्‍लंघन केल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर १० हजार रुपयांची दंडात्‍मक काराई करण्‍यात आली आहे. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे, खदान पोलिस स्‍टेशनचे ठानेदार श्री खंडेराव, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे आदिंची उपस्थिती होती.