

Akola
esakal
अकोला: १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी ) बसविणे अनिवार्य करण्यात आले असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असतानाही आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ६८ हजार वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.