esakal | विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त

बोलून बातमी शोधा

विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त
विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर बुधवारी (ता. २१) पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली.

अकोला शहरातील राणी सती मंदिर रोड, गांधी चौक, सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक तसेच जठारपेठ चौक येथे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वतः उपस्थित राहून कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे एक हजारावर दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले असून संबंधित वाहनधारकांच्या विरोधार कारवाई करण्यात आली.

यावेळी उप विभागीय अधिकारी सचिन कदम यांच्या सह इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी संचारबंदीच्या काळात विना कारण रस्त्यावर फिरू नये, विना कारण कोणीही फिरताना आढळून आल्यास पोलिस विभाग तर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला आहे.

संपादन - विवेक मेतकर