विनाकारण बाहेर फिराल तर जागेवरच होणार तपासणी

कोरोना संकट ः संसर्ग टाळण्यासाठी पोलिसांचा पुढाकार
विनाकारण बाहेर फिराल तर जागेवरच होणार तपासणी

अकोला ः कारण नसताना संचारबंदी काळात घराबाहेर पडणाऱ्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे अशा नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी पोलिसांनी करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित नागरिकाला तत्काळ अलगिकरणात ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. If you go out without any reason, the check will be done on the spot

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने ता.१५ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाउन जारी केला आहे. अत्यावश्यक कामा शिवाय नागरिकांच्या फिरण्यावर बंदी आहे. संचारबंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी ७ ते ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेची आस्थापने सुरू ठेवली.

याचा गैरफायदा घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होऊन नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाने शहरात मुक्त संचार करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर स्वतः रोडवर उतरून ॲक्शन मोडवर काम करताना दिसत आहे. शहर वाहतूक शाखेने सुद्धा अशा नऊ हजारांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यातून लाखो रुपये दंड वसूल केला.

जवळपास ४०० चे वर वाहने जप्त करून वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम हे शहरातील सर्व पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह संचारबंदीत शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होईल याकडे जातीने लक्ष देत आहे. त्यासाठी त्यांना आता विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची जागेवर कोरोना चाचणी करून घेण्यास सुरुवात केली.

त्याची सुरुवात बुधवारी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनच्या चौकात मनपाचे सहकार्याने करण्यात आली. त्यासाठी पावस ट्रॅव्हल्सचे अजयसिंग सेंगर यांनी स्वतःचे मालकीची लॅक्सरी वाहन टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिले. शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक उत्तमराव जाधव, शहर वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोतवाली चौकात स्वतः थांबून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करवून घेतली.

१५० वर नागरिकांची चाचणी

विनाकारण घराबाहेर पडून रस्त्याने फिरणाऱ्या जवळपास १५० चे वर नागरिकांची कोतवाली चौकात कोविड चाचणी मनपाचे वैद्यकीय चमूकडून करून घेण्यात आली. यावेळी मनपाचे क्षेत्रीय अधिकारी टापरे आपल्या वैद्यकीय चमू सोबत उपस्थित होते. पावस ट्रॅव्हल्सचे अजयसिंग सेंगर हे सुद्धा जातीने हजर होते.

प्रत्येक मुख्य चौकात चाचणी

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे सुरूच ठेवल्यास यानंतर शहरातील प्रत्येक मुख्य चौकात पोलिसांतर्फे कोविड चाचणी मोहीम राबविली जाणार आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करवून घेऊन पॉझिटिव्ह येणाऱ्यांना सर्वोपचार रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात येईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी सांगितले. चाचणी झाल्यानंतर गृह विलगीकरणात अशा नागरिकांना ठेवले जाणार आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com