
किरण क्षार यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
कारंजा : शहरातील अवैध बांधकाम व कॉम्प्लेक्स मालकांनी पार्किंगच्या जागा हडपल्याबाबत किरण क्षार यांनी सतत तक्रारी केल्या. परंतु, त्यावर मुख्याधिकारी दादाराव डोल्हाकर यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे, दि. २ मार्च रोजी न.प. मुख्याधिकारी यांना पत्र देऊन अवैध बांधकामावर कारवाई न झाल्यास दि. १० मार्च रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. तरीही कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. कारंजा शहर पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी मध्यस्थी करून किरण क्षार यांना ताब्यात घेतले.
सदरहू, प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी सुद्धा वरील तक्रारीवर कारवाई करण्याबाबत दिनांक ९ मार्च रोजी मुख्याधिकारी यांना कळविले आहे.कारंजा शहरांमध्ये अवैध बांधकामांना उत आलेला आहे. याला अभय कारंजा न.प. मुख्याधिकारी डोल्हारकर व नगर अभियंता सुधाकर देशमुख यांचे असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. फक्त पैसे द्या आणि कुठेही व कसेही बांधकाम करा असा बिनधास्त मनमानी कारभार नगरपरिषद कारंजामध्ये सुरू असल्याचा खेद सुद्धा त्यांनी व्यक्त केला. शहरांमध्ये दुकान घर किंवा इतर बांधकाम करावयाचे असल्यास नगर परिषदेकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी, नियमाप्रमाणे अर्ज करावा लागतो. हे सर्व नियम कारंजा नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी आहे.
नियमबाह्य अवैध बांधकाम करणासाठी कोणती हे नियम व अटी नाही. कोणताही अर्ज करावा लागत नाही. फक्त पैसे द्या व कोठेही व कसेही बांधकाम करा. असा, प्रकार सध्या कारंजा नगर परिषदेमध्ये सुरू आहे. कारंजा शहरातील अवैध बांधकामाची माहिती, माहिती अधिकारांतर्गत समोर आली होती. तक्रार करून सुद्धा मुख्याधिकारी यांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. असा त्यांच्यावर आरोप आहे. शहरात एवढेच अवैद्य बांधकाम नसून बऱ्याच ठिकाणी पैशाच्या जोरावर अवैद्य बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच शहरात कमर्शियल कॉम्प्लेक्स च्या मालकांनी पार्किंगची जागा हडप केल्याची माहिती सुद्धा लवकरात लवकर कारंजावासियांच्या पुढे येईल. असा, इशारा त्यांनी यावेळी दिली.
Web Title: Illegal Construction And Parking Case Kiran Kshaar Attempt Self Immolation Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..