
अकोला : घरगुती गॅस सिलेंडरचा वापर ऑटोमध्ये गॅस भरण्यासाठी अवैध पद्धतीने होत असल्याच्या गुप्त माहितीनुसार जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने अकोट फाईल भागात कारवाई करत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ५४ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.