Maharashtra Gutka Ban: महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी बाळापूर पोलिस उपविभागात अवैध गुटखा विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाळापूर : गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री, प्रदर्शन, उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली आहे तर, दुसरीकडे बाळापूर पोलिस उपविभागात सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे.