
वाशीम : आतापर्यंत कारंजा, अमरावतीतून चालणारा गुटख्याचा अवैध व्यवसाय आता वाशीम जिल्ह्यातील शिरपूर व मालेगाव या शहरातून चांगलाच फोफावला आहे. या अवैध व्यवसायातून निर्माण होणारे अर्थकारण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पथ्यावर पडत असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावत असल्याचे चित्र समोर येत आहे. या शहरातून खामगाव, हिंगोली या शहरातही गुटखा पाठविला जात असताना हा आंतरजिल्हा अवैध व्यवसाय सबंधित यंत्रणेच्या जाणीवपूर्वक डोळेझाक करण्याचा परिपाक असल्याची चर्चा आहे.